सलग नवव्या वर्षातील युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सलग नवव्या वर्षातील युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा 2022 हा बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी पार पडला यावेळी प्रमुख मार्गदर्शक व महाराष्ट्र आयकॉन विश्वास पाटील यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विश्वास पाटील यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे मानवतेचे आयकॉन असून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी गुण अंगी अंगिकारला तरी आयुष्याचं कल्याण होईल . त्याचबरोबर त्यांनी बोलताना सांगितले की जगातील कुठल्याही यात्रे पेक्षा जर रायगड यात्रा केली नाही तर जीवन अपूर्ण आहे. नुकतीच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरची महासम्राट ही कादंबरी एक ऑगस्ट रोजी प्रकाशित होत असून त्याच्यामधील अश्वमेध घोडा याची ओळख जगाला होईल असे लेखन केले आहे या आयकॉन प्राप्त मान्यवरांचे कौतुक करत आयकाँन सोहळ्याचे ही कौतुक विश्वास पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर आयकॉन सोहळ्याचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह सावता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, असिफबाई तांबोळी, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, कंजूमर फेडरेशनचे अध्यक्ष अरुण कापसे ,संपादक संतोष सुर्यवंशी, उद्योजक सुनील भराडिया व कॉटन किंगचे अशोक जाधवर हे उपस्थित होते.युगदर्शक आयकॉन सोहळ्याच्या नवव्या वर्षी विश्वास पाटील यांना महाराष्ट्र आयकॉन देऊन गौरविण्यात आले तसेच राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये पोलीस आयकॉन पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, महिला आयकॉन उमा मुंबरे सरपंच आयकॉन डॉक्टर प्रियंका खरात ,महसूल आयकॉन तहसीलदार रेणुकादास देवणीकर तर बार्शी आयकॉन या क्षेत्रांमध्ये वैद्यकीय आयकॉन म्हणून डॉक्टर शीतल बोपलकर, शिक्षण व प्रशासन आयकॉन अनिल बनसोडे, सामाजिक आयकॉन वृक्ष संवर्धन समिती बार्शी, युवा आयकॉन कृष्णराज बारबोले , श्रमिक आयकॉन अजित कांबळे, कला आयकॉन सुनील यादव यांना आयकॉन 2022 हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी प्रत्येक आयकॉन प्राप्त मान्यवरांची कामाची चित्रफित सभागृहांमध्ये दाखविण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये असणारे कल्याण काका आखाडे यांनी आयकॉन सोहळ्याचे कौतुक करत आयकॉन प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले जगाच्या पाठीवर चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक व्हायला पाहिजे ती परंपरा गेली नऊ वर्ष बार्शी मध्ये युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याने जपली आहे व ही परंपरा कायम राहावी यासाठीही कल्याण काका आखाडे यांनी शुभेच्छा दिल्या बार्शीकर हे चांगले श्रोते असून आता बार्शीकर मन भरून दुसऱ्याच कौतुक करतात हे चित्र या आयकाँन सोहळ्याच्या रूपाने दिसले असेही प्रतिपादन कल्याण आखाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सर्व आयकॉन गुणवंताच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी सोपल बोलताना म्हणाले, आयकॉन पुरस्कार देण्याचा एकच भेटी आहे जोकी पुरस्कार प्राप्त गुणवंताचा एक जरी गुण आपल्याला घेता आला तरी या आयकॉन कार्यक्रमाचं उद्दिष्ट सफल झालं असं सोपल यांनी सांगितले. पुढे बोलताना सोपल म्हणाले बार्शी सारख्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये आयकॉन सारखा दिमाखदार व दर्जेदार पुरस्कार सोहळा सलग होतोय हे बार्शी साठी भूषण आहे आणि हा आयकॉन सोहळा येथून पुढे कायम राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये युगर्शक आयकॉन सोहळ्याचे विश्वस्त नितीन भोसले यांनी सांगितले, बार्शीकर यांच्या प्रेमामुळे हा युगदर्शक आयकॉन सोहळा आज नवव्या वर्षात पदार्पण करत आहे व येथून पुढे पुढच्या वर्षी दशकपूर्ती या आयकाँन सोहळ्याची घ्यायची आहे यासाठी आत्तापासूनच तयारीला लागलो असून दशकपूर्ती सोहळा हा भूतो न भविष्यती होईल असेही त्यांनी सांगितले. आयकॉन सोहळ्याचे आभार प्रदर्शन सुधीर खाडे यांनी केले. हा आयकॉन पुरस्कार सोहळा यशस्वी व्हावा यासाठी सुधीर खाडे, दिनेश नाळे , श्रीकृष्ण उपळकर, गणेश शिंदे , गुरु साखरे, विजयसिंह पाटील, शितल नाळे, गणेश मोरे, मेजर विजय शिंदे, मिथुन भोसले, किरण भीसे, आदींनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले.