निवडबार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

B1न्यूज मराठी नेटवर्क 50000

बार्शी : मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी या विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते.त्यापैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ इतकी आहे आणि चि.आदित्य दिपक म्हेत्रे हा विद्यार्थी १५३ गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आलेला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम देशमुख व सुजित लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.5000सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य अरुणजी देबडवार, खजिनदार जे.सी. शितोळे, शाळा समिती सदस्या डॉ.सौ.मीराताई यादव, शाळा समिती सदस्य श्री शेळवणे, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, पर्यवेक्षक के.जी.मदने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button