मॅटवरच्या कुस्तीला जास्त प्राधान्य द्यावे : महाराष्ट्र केसरी पै . पृथ्वीराज पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क : प्रतिनिधी – गौतम नागटिळक
वैराग : मातीतून सुरू झालेली कुस्ती आज मॅटवर पोहचली आहे. माती पेक्षा मॅटवरील कुस्तीला ग्लोबल तर आहेच शिवाय नोकरीची संधीही आहे ,त्यामुळे करिअर म्हणून कुस्ती क्षेत्र निवडू शकता असे मत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वैराग येथे त्यांचे मित्र उत्कर्ष डुरे यांच्या भेटीला आले असता. आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी उत्कर्ष डुरे यांच्या परिवाराच्या वतीने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ,उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील , पृथ्वीराज पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील ,पृथ्वीराज पाटील यांचे भाऊ पै .राजवर्धन पाटील यांचा सत्कार आनंदकुमार डुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जय जगदंबा शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके , वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर ,वस्ताद किशोर ताटे ,संतनाथ कुस्ती मैदानाचे पै. नंदकुमार पांढरमिसे वैजिनाथ आदमाने ,लक्ष्मण देवकर , पै. किशोर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .
याकार्यक्रमास मुख्याध्यापक शहाजी आगलावे , सुरेश गुंड ,खंडेराया घोडके ,सुभाष सुरवसे नगरसेवक अक्षय ताटे , वस्ताद पिंटू लांडगे , श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे किरण डिसले , जय हनुमान तालमीचे वस्ताद बप्पा सुतार व सर्व सदस्य , इर्लेचे माजी उपसरपंच संजय डुरे – पाटील ,बनू सावंत , घाणेगांव येथील वस्ताद बालाजी शिंदे , मेजर जगन्नाथ आदमाने , सूर्यकांत मगर ,प्रमोद गायकवाड , रयत सेवक बँकेचे संचालक विजयकुमार डुरे ,ओम मगर , सुनिल जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध संस्था व मान्यवरांच्या हस्ते पै. पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार आनंदकुमार डुरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पै. किशोर सावंत व पै.उत्कर्ष डुरे यांच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले .