रमाई चषक पुण्याच्या संघाकडे एक लाखाच्या बक्षीसाचे मानकरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिम टायगर संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हवेली पुण्याच्या रोहित लाखाळ इलेव्हन संघाने तुळजापुरच्या छत्रपती क्रिकेट संघाचा पराभव करत मातोश्री रमाई चषकावर नाव कोरले.
आ.राजेंद्र राऊत यांच्या वतीने एक लाख रुपयाच्या बक्षिसाचे मानकरीही पुण्याचेच खेळाडू ठरले.
अंतिम सामन्यात त्यांनी निर्धारित पाच षटकांत चार बाद ४५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तुळजापूरच्या संघाला प्रत्येक षटकांमध्ये पुणेकर खेळाडूंनी रोखून धरले होते. धावांचा पाठलाग करण्याच्या नादात एका मागोमाग एक गडी बाद होत गेल्याने अवघ्या तीस धावाच तुळजापूर संघास करता आल्या. अंतिम सामनेवेळी भगवंत स्टेडियम प्रचंड गर्दीने फुलून गेले होते.
या स्पर्धेत तिसरा क्रमांक सोलापूर आणि बार्शीच्या एकविराई संघास विभागून देण्यात आला. तुळजापूर संघाला ७१ रुपयाच्या दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, उद्योगपती दादासाहेब गायकवाड, राहुल राऊत, रणजीत मुसळे माजी नगरसेवक संदेश काकडे, विजय चव्हाण, दीपक राऊत, संतोष बारंगुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अंतिम सामन्यात पंच म्हणून दीपक ओहोळ आणि मिलिंद ताकपीरे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भिम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर वाघमारे, संदीप आलाट, दयावान कदम, नितीन मस्के, विजय कदम, अजय कदम, बाबा शेंडगे, संतोष गायकवाड, शौकत बार्शीकर, सतीश झोंबाडे, रोहन गायकवाड, सुहास ओहाळ, सुरज कांबळे यांच्यासह भीमनगर मधील भीमसैनिकांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या