बार्शी तालुक्यातील यावली गाव ठरले “स्मार्ट ग्राम”,सोलापूर येथे पालकमंत्र्यांचा हस्ते सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सन 2020-21 अंतर्गत यावली ग्रामपंचायत ला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.तीन तालुक्यांचा सीमेवर वसलेले यावली गाव,गावची लोकसंख्या 2200 चा आसपास सर्व जाती – धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहून सर्व सण – उत्सव एकत्र साजरे करतात, गावचे विशेष म्हणजे 2021 ला झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या 9 सदस्यांपैकी 7 सदस्य अगदी तरुण असून सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिला आहेत.
गावामध्ये बंदिस्त गटार, पिण्याचे शुद्ध पाणी, जलसंधारण, पथदिवे, कचराकुंडी व्यवस्था आदी कामे झाली असून अजून बरीच कामे सुरू आहेत . गावाने “स्व.आर.आर. पाटील सुंदर गाव स्पर्धा” अर्थातच “स्मार्ट ग्राम” या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवत रू.10 लाखांचे पारितोषिक मिळवले आहे. याचे वितरण आज दि.13 मे 2022 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे पालकमंत्री दत्ता (मामा) भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम,इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी गावचा सरपंच रुपाली तुरे,उप सरपंच निवेदिता उकरंडे, माजी सरपंच प्रल्हाद तुरे सर, ग्रामसेवक किरण वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अमित सरवदे, शरद काकडे, सौ.वैशाली सतीश गायकवाड, सौ.माधुरी निलेश उबाळे, जब्बार बागवान, आप्पा मांजरे, सौ.सुवर्णा काका सरवदे, अनिता देवकते मॅडम, संजय क्षीरसागर, समाधान उकरंडे, तात्या कोठारे आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायत टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






