युवा उद्योजक प्रविण चिकणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; मेहनत, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी प्रवास
B1न्यूज मराठी नेटवर्क 
बार्शी दि. २८ : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील सुपुत्र तथा पुणे परिसरात हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे युवा उद्योजक प्रविण चिकणे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशस्वी वाटचालीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीपेक्षा व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा ध्यास प्रविण चिकणे यांनी घेतला. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्यांनी पुणे परिसरात चार हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे उभे करून स्वतःचे नाव मोठे केले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या प्रविण यांनी संघर्षाला संधी मानत हॉटेल उद्योगात उल्लेखनीय शिखर गाठले आहे.
त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारा आहे. ग्राहकांशी जिव्हाळ्याने वागणे, कामगारांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मान देणे आणि प्रत्येकाशी आदराने संवाद साधणे, ही त्यांची विशेष ओळख मानली जाते. त्यामुळे व्यवसायासोबतच त्यांनी माणसे जोडण्याचीही मोठी ताकद निर्माण केली आहे.
व्यवसायात यश मिळवतानाच प्रविण चिकणे यांनी आपल्या मूळ गावाशी असलेले नाते कायम जपले आहे. गुळपोळी गावातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थ सांगतात.
आजच्या तरुण पिढीसाठी प्रविण चिकणे यांचा प्रवास हा प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण, मेहनत, जिद्द आणि सामाजिक संवेदनशीलता यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
युवा उद्योजक प्रविण चिकणे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी B1 NEWS MARATHI परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🎂🌹





