पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण १००% मोफत; काम गतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बुलढाणा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जलदगतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपला ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) क्रमांक सोबत घेऊन जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रांवर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) त्वरित पूर्ण करावे. ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी १००% मोफत असून, योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी दिले आहेत.500ही पहिली यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, विकास सोसायट्या आणि बँकांच्या शाखांमध्ये सर्वांना दिसेल अशी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या पहिल्या यादीत नाहीत, त्यांनी अजिबात काळजी करू नये, त्यांची नावे पुढील यादीत नक्की येतील, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते व कर्जमाफीची रक्कम तपासून मोफत आधार प्रमाणीकरण करावे. ई-सेवा केंद्र चालकांना शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांना कोणतेही शुल्क देऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, माहितीत काही चूक वाटल्यास शेतकऱ्यांनी थेट पोर्टलवर तक्रार नोंदवावी, प्रशासकीय समिती ती तत्परतेने सोडवून न्याय देईल.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या