श्री भगवंत सहकारी संस्थेच्या वतीने डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरला देणगी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांच्या अद्ययावत रुग्ण सेवेसाठी नव्याने उभारणी केलेल्या ट्रॉमा सेंटर युनिट व सेंट्रल आय सी यु युनिट साठी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून देणगी रुपये एक लाखाचा चेक संस्थेचे चेअरमन आनंद कुलकर्णी (अंबेजवळगेकर) यांच्या हस्ते शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव यांच्या कडे देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदाळे मामा हॉस्पिटलचे सुपरिडेंट डॉ. रामचंद्र जगताप यांनी केले. ट्रॉमा सेंटर युनिट उभारणीची पूर्ण उद्देश व माहिती डॉ.यादव यांनी दिल .ट्रॉमा सेंटरच्या कार्याबाबत संस्थेचे चेअरमन आनंद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आनंद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन उमेश ठोंबरे, संचालक डॉ. बी वाय यादव , रामचंद्र गौरकर, नंदकिशोर देशमुख , शब्बीरभाई तांबोळी , संस्थेचे प्रभारी व्यवस्थापक रविंद्र माचवे तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव, मधुकर मोहिते,पी.टी. पाटील, रेवडकर ,सुपरिडेंट रामचंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.