महात्मा बसवेश्वर महाराज जयंती: स्नेहग्रामला धान्याची मदत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ‘काय कवे कैलास’ हा श्रममंत्र ज्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी दिला, पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरून घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या वैदिक कर्मठांच्या विषमतावादी समाजरचनेच्या चिरेबंदी बुरुजास ज्यानी सुरुंग लावला. वंचित, उपेक्षित शुद्रातीशुद्राना एकत्र करुन त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी अनुभव मंडप ही लोकसंसद यांनी बाराव्या शतकात स्थापन केली. खऱ्या अर्थाने महिलांना 50 टक्के आरक्षण बाराव्या शतकात दिले. अनिष्ट प्रथा, परंपरा,अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद व वर्णभेद यावर ज्यांनी प्रहार केला त्यांचे नाव महात्मा बसवेश्वर महाराज आज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत बार्शीतील तरुणाईंनी समाजोपयोगी उपक्रम राबवत अनोख्या जयंती साजरी केली.कोविड काळानंतर सामाजिक संस्थांसाठी विशेषतः निवासी सामाजिक प्रकल्पांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या संस्था मूलभूत प्रश्नांशी सामना करावा लागत आहे. शासकीय अनुदान नाही, नियमित देणगी नाही, तरीही खर्चाला अनेक वाटा आहेत. खरं तर ही कसरत कार्यकर्त्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरू पाहत आहे. अशा स्थितीत बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश काटकर सर यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुभाष नगर लिंगायत समाज बार्शी या ग्रुपच्या तरुणांना स्नेहग्रामचा पर्याय सुचवला. तेव्हा सामाजिक जाणिवेतून स्नेहग्रामला धान्य मदतीचा विचार पुढे आला. यासाठी सुभाष नगर लिंगायत समाज बार्शी पुढाकार घेऊन स्नेहग्रामला धान्याची मदत केली. यावेळी दिनेश काटकर, योगेश घंटे, मयुर सोनके, नितीन कोरे, अभि पुरवंत, रोहीत तोडकरी, नितीन कंटीमट, अनिल गारमपल्ली, मिलींद गाढवे, आकाश शेटे, शैलैश शेटे, शिवलिंग साबळे, सुमित जिरेकर , अक्षय भुईटे, अभिजीत झाडे, किशोर कांबळे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या