बार्शीत रमजान ईद उत्साहात साजरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी – ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद एक महिना उपवासा नंतर परमेश्वरा ची आराधना करण्यासाठी व आभार मानण्यासाठी साजरी करण्यात येते. या ईद चे महात्म्य म्हणजे गरजू गरीब यांना आपल्या घासातील घास देणे, कपडे ,अन्नधान्य, आर्थिक अडचण सोडवणे इतर अडचणी असल्यास समाजातील श्रीमंतांनी समाजातील गरीब गरजूंना जकात च्या माध्यमातून दान मदत करण्याचा हा पवित्र महिना असून यामुळे सामाजिक बंधुता समभाव माणुसकी आपुलकी ची शिकवण रमजान च्या माध्यमातून होते. रमजान ईद निमित्त बार्शी येथील ईदगाह मैदान परांडा रोड या ठिकाणी मदिना मस्जिद चे इमाम अनवारूल हक यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली. यावेळी शहरातील हजारो नागरिकांनी नमाज पठण केले. यावेळी दुवा प्रार्थना मध्ये इमाम उल हक यांनी भारत देशातील सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव वाढावा, कोरोना पासून व इतर रोगराई पासून आपल्या देशाचे रक्षण व्हावे. सुजलाम सुफलाम देश व्हावा, राष्ट्रीय एकात्मता वाढावी, जगातील विविध भागातील युद्ध थांबून माणुसकी धर्म वाढावा, यासाठी प्रार्थना केली. तसेच कब्रस्तान येथे आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना केली.
बार्शी चे पोलीस उपविभागीय अधिकारी नाल कूल साहेब तसेच बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास जी शेळके साहेब व शहर पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातील व ईदगाह मैदान येथील बंदोबस्त व्यवस्था चोक ठेवली होती. तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशन च्या वतीने मुस्लिम बांधवांना नमाज नंतर ईदनिमित्त गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

ईद निमित्त माजी मंत्री दिलीपरावजी सोपल , आमदार राजेंद्र राऊत भाजपचे नेते मिरगणे, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, शिवसेना शहर प्रमुख दीपक भैय्या आंधळकर, बार्शी चे तहसीलदार शेरखाने साहेब, माजी नगराध्यक्ष असीफ भाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ बारबोले विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे इत्यादींनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच असंख्य हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी हिंदू समाजातील बांधवांना आपल्या घरी स्वागत करून शीरखुर्मा चे आस्वाद साठी निमंत्रण दिले. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या वातावरणात बार्शी शहरात रमजान ईद कोरोना चे दोन वर्षाच्या नंतर उत्साहात साजरी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या