जय भगवंत ढोल – ताशा , ध्वज पथकाचा वाद्य पुजन सोहळा आमदार राजाभाऊ राऊत यांचा हस्ते संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त भगवंत महोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रकट दिना दिवशी शहरातील प्रमुख मार्गाने शोभा यात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत जय भगवंत ढोल पथकाचा वतीने सादरीकरण करण्यात येणार आहे. या निमित्ताने वाद्यांचे पुजन आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जय भगवंतच्या सहभागाने महोत्सव दणक्यात साजरा होणार असे प्रतिपादन राजेंद्र राऊत यांनी केले.यावेळी रावसाहेब मनगिरे ,नगरसेवक दिपक राऊत, विलास रेणके , रोहित लाकाळ, विजय चव्हाण, गणेश चव्हाण, भैय्या बारंगुळे, सुभाष लोढा, स्वप्निल मोहिते, दादासाहेब बुडूख, श्रीधर कांबळे, मुन्ना सोनिग्रा, संतोष सुर्यवंशी, राजश्री डमरे, प्रशांत खराडे,पत्रकार शहाजी फुरडे, गणेश गोडसे, गणेश भोळे, टिंकु पाटील, धीरज शेळके, विनोद ननवरे, पथक प्रमुख उमेश काळे, हर्षद लोहार, प्रविण परदेशी, अविनाश बोकफोडे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या