कामगारांचे हक्क हिरावून घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला सारा : संदीपानभाऊ झोंबाडे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे झालेल्या असंघटित कष्टकरी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संघटनेचे संस्थापक संदीपानभाऊ झोंबाडे यांनी सांगितले की कामगारांच्या हक्काचे किमान वेतन इथले सत्ताधारी प्रस्थापित व अधिकारी यांनी वाटून घेतल्यानेच कामगारांना त्यांच्या हक्कांचे वेतन मिळू शकत नाही, कामगारांना सुरक्षा साधने, वेळेवर वेतन, प्रॉव्हिडंट फंड, इ एस आय च्या रकमा यापासून वंचित ठेवणारांना आंदोलनातून धडा शिकवला जाईल तसेच जे सत्ताधारी कामगारांचे शोषण करतील त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवा व बौद्ध व मातंग समाजातील समाजबांधवांनी आता एकीने अन्यायाविरुद्ध लढा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे ऍड वैभव गीते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शासन स्तरावर कामगारांना न्याय देण्यासाठी जनआंदोलन गरजेचे आहे आजचा मीडिया आपली दखल घेईलच असे नाही तर आपल्या जवळच्या सोशल मीडियातून आपले प्रश्न प्रखरपणे मांडणे गरजेचे आहे. यावेळी विचारमंचावर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मा. सागरभाऊ पेटाडे, रिपाइं (आठवले) गटाचे शहराध्यक्ष ऍड अविनाश गायकवाड, माळशिरस चे विकास धाइंजे, परमेश्वर कसबे, अजित कांबळे ऍड धीरज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल पेटाडे, मक्रोज बोकेफोडे, निलेश खुडे, मनोज गवळी, रामेश्वर पालके, विजय ढावारे, उज्वला बोकेफोडे, सुनंदा चव्हाण, शांता जाधव, संगीता गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.






