वैराग येथील प्रभाग क्रमांक १६ येथे रमजान ईद निमीत्त दूध व शिरखुर्मा साहित्याचे वाटप मोफत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : आमदार राजेंद्र राऊत व जि.प. सदस्य संतोषदादा निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. अर्चनाताई बाबासाहेब माने रड्डी यांच्यातर्फे वैराग येथील प्रभाग क्र. १६ मधील सर्व मुस्लिम कुटुंबाना रमजान ईद निमीत्त प्रत्येकी ५ लिटर प्रमाणे शुद्य घोटकर दूध व शिरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुस्लिम समाजाला रमजान ईद निमीत्त आपलेतर्फे एक छोटीशी भेट म्हणून व हिंदु – मुस्लिम ऐक्य असेच कायम रहावे या हेतूने मोफत दूध व शिरखुर्मा साहित्याचे वाटप नगरसेविका सौ . अर्चनाताई बाबासाहेब माने रड्डी यांनी केलेबद्दल मुस्लिम समाज्याच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे व नगरसेविका सौ. अर्चनाताई बाबासाहेब माने रड्डी यांचे कौतुक केले जात आहे.

सदर कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाचे सदस्य आशिष गांधी, श्री बाळासाहेब लोखंडे, बादशाह शेख , समर्थ मोहिते , राज गायकवाड , दक्षक दिलपाक , अहमद शेख , समर्थ ठोकळ , विकास वायकर , जावेद शेख , गणेश मोहिते , राहुल गाटे , बिरु हजारे , सुहास संकपाळ , आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या