ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिन उत्साहात साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताचा प्रकट दिन उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला सात दिवसापासून चालू असलेल्या भगवंत महोत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी प्रकट दिनाच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता भगवंत मंदिरात जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन झाले . यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी विश्वस्त मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते पहाटे महापूजा झाली भगवंत लक्ष्मी ची सोन्याचे अलंकार घालून तुळशीमाळा सह अकर्षक पूजा बांधण्यात आली होती. सूर्योदयापूर्वी प्रकट उत्सव साजरा झाला सकाळी सहा वाजता श्री भगवंतावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आमदार राजेंद्र राऊत यांनी श्री ची उत्सवमूर्ती डोक्यावर घेत मंदिर प्रदिक्षणा केली. सकाळी नऊ वाजता बार्शी शहरातील प्रमुख मार्गावरून भगवंताच्या उत्सव मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये भगव्या पताका घेऊन ग्रामीण भागातील दिंड्या ही सहभागी झाल्या होत्या भजनी मंडळे भगवंत ढोल ताशा पथकाने दणक्यात सादरीकरण करत बार्शीकराचे लक्ष वेधून घेतले. महाद्वार चौकात फूलवाले यांच्यावतीने तसेच ऐनापूर मारुती चौकात कथले परिवाराच्या वतीने श्रीच्या उत्सव मूर्तीवर पुष्पवृष्टी केली या शोभायात्रेत आमदार राजेंद्र राऊत माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आसिफ तांबोळी देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिलीप बुडुख महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा संतोष सुर्यवंशी अभिजीत सोनिग्रा श्रीधर कांबळे प्रशांत कथले दिलीप गांधी वर्षा रसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शोभा यात्रेनंतर शहरातील मॉर्निंग सोशल क्लब च्या वतीने मॉडेल हायस्कूलच्या प्रांगणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जाणीव फाउंडेशन जार संघटनेने थंड पाण्याची सोय केली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या