बाबुराव डिसले स्मृती गौरव पुरस्काराचे आयोजन , 10 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे मंडळाचे सचिव प्रताप दराडे यांचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ज्येष्ठ उद्योगपती शिवाजीराव डिसले यांच्या जयंतीनिमित्त सुरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने येत्या 6 जानेवारी 2026 रोजी कै बाबुराव डिसले स्मृती जीवन गौरव पुरस्कार विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना व कै शिवाजीराव डिसले शेठ युवा उद्योजक पूरस्कार दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रविंद्र कापसे यांनी दिली.
पुरस्काराचे हे 21 वे वर्ष असून कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व उत्कृष्ठ पत्रकारिता असे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. राज्यपातळीवर कार्यरत अष्टपैलू अभिनेते, नामवंत लेखक, उद्योगपती, शिक्षणतज्ञ, नामवंत पत्रकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
विविध क्षेत्रातील गुणवंतांनी पुरस्कारासाठी आपल्या माहितीचे अर्ज रचना निवास, 100 फुटी रोड, उपळाई रस्ता, बार्शी जिल्हा सोलापूर येथे 10 डिसेंबर 2025 पर्यंत द्यावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव प्रताप दराडे संपर्क क्रमांक 9028452207 यांनी केले.




