लाचलुचपत प्रकरणी पंचायत समितीचा पदविस्तार अधिकारी रंगेहात अटक!

0

दक्षिण सोलापूरमध्ये अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई; दोन हजार रुपयांच्या लाच रकमेसह अधिकाऱ्याला पकडले भ्रष्टाचार निर्मूलन समिती सोलापूर

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील पदविस्तार अधिकारी संदिप सुधाकर खरबस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून शासनाच्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या बील मंजुरीसाठी लाच मागितल्याची माहिती पुढे आली आहे.

मौजे गेळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे शासनाच्या १९व्या वित्त आयोगांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. त्या कामाचे एक लाख रुपयांचे बील मंजूर व्हावे म्हणून तक्रारदाराने पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. मात्र, बील मंजुरीसाठी पदविस्तार अधिकारी संदिप खरबस यांनी स्वतःसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरोकडे करण्यात आली.

तक्रारीच्या पडताळणीनंतर ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ACB सोलापूर पथकाने सापळा रचला. या दरम्यान संदिप खरबस यांनी जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार, रविंद्र लामाते, तसेच पोह. अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली. संपूर्ण मोहिम पोलीस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ACB, पुणे विभाग) आणि अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांसाठी आवाहन :
जर कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल, तर नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरशी संपर्क साधावा.
📞 ACB सोलापूर संपर्क:

0217-2312668

WhatsApp: 9404001064

Email: dyspacbsolapur@gmail.com

Website: www.acbmaharashtra.gov.in

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या