भैरवनाथ विद्यालयास जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी, जि. सोलापूर या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता माऊली लॉन्स बार्शी या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये वर्षभर उपक्रम राबवल्याबद्दल भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी या शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यामध्ये विद्यालयाने वर्षभर उपस्थिती ध्वज, एम.एन.एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यार्थी वाढदिवस, आदर्श परसबाग, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम राबवले त्याबद्दल विद्यालयास उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, विशाल गरड या प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सेकंडरीचे संचालक प्रमोद देशमुख व संतोषकुमार चिकणे , राजकुमार काशीद , कल्याण साठे , सत्यवान माळी , गोरोबा कुंभार , क्रांतीसिह माने , निरंजन देशमुख , चारुदत गवळी , गणेश शिंदे . अविनाश कुंभार , शकील पटेल उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अरुण कापसे, सचिव अभिजीत कापसे, मा .आ .दत्तात्रय सावंत गुळपोळीचे सरपंच, ग्रामस्थ यांनी प्रशालेचे अभिनंदन केले.




