स्व. अंकुल (गोलू) चव्हाण यांच्या स्मरणार्थ १३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील उपळाई रोड येथे स्व.अंकुल (गोलू)चव्हाण यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त स्व.अंकुल(गोलू)चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे मा. आ.राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आल.
यावेळी सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर, विविध मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये शैला लकुळे या महिला रक्तदात्यानी त्याचे १११ वे रक्तदान केले तसेच सुहास पाटील या रक्तदात्यानी त्याचे १०३ वे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरात १३१रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडले. याशिबिरासाठी स्व.अंकुल(गोलू) चव्हाण मित्रपरिवार, अभिनंदन भोसले, राहुल बारंगुळे, संदेश काकडे, सुनिल शेळवणे, विक्रम पवार, रोहीत वायकर, सागर मगर, सागर मुंढे, रोहीत कातुरे, आकाश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.




