प्रभात शाळेच्या विद्यार्थ्यांचीपूरग्रस्तांना एक लाख ५१ हजार रू. मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
अकोला, दि. १५ : येथील प्रभात किडस् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त बांधवांसाठी एक लाख ५१ हजार रू. निधी गोळा केला. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे सुपुर्द केली.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विद्यार्थ्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून आभार मानले.
महाराष्ट्रात अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पुररिस्थती निर्माण झाली आहे. या आपत्तीमध्ये अनेक संसार उधवस्त झाले असून, घरे, शेती, जनावरे व उपजिविकेची साधने वाहून गेली आहेत. तसेच हजारो कुटूंब बेघर होवून निवाऱ्याशिवाय राहत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला व प्रकल्पप्रमुख म्हणून कु अपूर्वाने संपूर्ण विद्यार्थी प्रतिनिधींसोबत जाऊन आज ह्या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी महोदय यांना दिला. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांच्या या सजग सामाजिक जाणीव व कृतीशीलतेमुळे सर्वांचे कौतुक केले.




