अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांची लालबावट्याच्या संघटनेमुळे दिवाळी झाली गोड; जिल्ह्यातील सर्व अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर यांना मिळाला बोनस व गणवेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक संलग्न सोलापूर जिल्हा अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारक संघटनेच्या गेल्या तीन वर्ष सातत्यपूर्ण बोनस व गणवेश या मागणीला अखेर यश आले आहे. जिल्ह्यातील अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर यांना दिवाळीचा बोनस एक हजार रुपये तसेच साडी खरेदीसाठी एक हजार रुपये जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संघटनेला देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे दिवाळीच्या अगोदर ही रक्कम अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारिका यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिनांक 14 ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर यांनी निर्गमित केले आहेत. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व सचिव डॉ. प्रवीण मस्तुद, कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.
आयटक संलग्न अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय ही संघटना गेली तीन वर्ष सातत्याने बोनस व ड्रेस पुढे ही मागणी करीत होती. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलने केली होती. जिल्हा परिषदेकडून बोनस गणवेशासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक होते. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये ही तरतूद करून यावर्षी बोनस व गणवेश चे पैसे अर्धवेळ आरोपी स्त्री परिचय यांच्या खात्यावरती दिल्यामुळे अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचारिका महिन्याला तिन हजार रुपयांवर काम करतात. अत्यंत अल्प वेतनावर काम करीत असल्यामुळे त्यांना दिवाळीसाठी बोनस देणे आवश्यक होते. त्यामुळे संघटना वारंवार ती मागणी लावून धरत होती अखेरच्या मागणीला यश आले आहे. हे यश संघटनेच्या सर्व लढाऊ अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर यांचे आहे.




