बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस तोडीला प्राधान्य द्यावे, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल : आनंद काशीद
येडेश्वरी शुगर खामगाव, इंद्रेश्वर शुगर उपळाई ठो, इंडियन शुगर तुर्कपिंपरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शेतकरी सध्या पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, त्या शेतकऱ्यांकडे थोडाफार चांगला असलेलं पीक म्हणजे ऊस आहे आणि तो सध्या तोडणीला आला आहे. त्या ऊस तोडणीच्या साठी या तिन्ही कारखान्यांचं कार्यक्षेत्र बार्शी तालुका आहे परंतु हे कारखाने ऊस मात्र कोण इंदापूर तर कोण माढा तालुक्यातील तर कोण इतर ठिकाणचा ऊस आणून गाळप करतात त्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची तीन कारखाने असून देखील फरपड होते त्यामुळे या तिन्ही कारखान्याने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासाठी प्राधान्य द्यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करून यांना भानावर आलो असा इशारा आनंद काशीद यांनी दिला.




