मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या ग्रंथास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉ. प्रविण सुरेखा मच्छिंद्र मस्तुद लिखित “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारीतेचा इतिहास” या ग्रंथास ज्ञानांकुर ग्रंथालयाचा 31 व्या वर्षी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सातारा जिल्हात देण्यात आला. हा पुरस्कार डॉ. मस्तुद यांचे भाऊजी पाटबंधारे खात्याचे इंजिनियर लक्ष्मण नेताजी कवठे यांनी स्वीकारला.
अधिक माहिती अशी की, “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारीतेचा इतिहास” या ग्रंथास ज्ञानांकुर दि. बुद्रुक तालुका पाटण जिल्हा सातारा येथील ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. गोपाळ बंडू थोरात स्मृती उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रथम क्रमांकाने दिला गेला. द्वितीय क्रमांक झापड कथासंग्रहास तसेच अवघा रंग एक झाला या ललित लेखसंग्रहास तृतीय क्रमांक पुरस्कार दिला गेला आहे. मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा एकत्रित इतिहास मांडणारा हा ग्रंथ आहे.
यावेळी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या, खजिनदार वर्षाताई ठोंबरे तसेच श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गाडेकर , कम्युनिस्ट नेते कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे , आई सुरेखा मस्तुद , मित्र यांनी शुभेच्छा दिल्या.