नवीन मराठी प्राथमिक विद्यालयात आनंद बाजार, हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग | नवीन मराठी प्राथमिक विद्यालय, पंचशील नगर, वैराग येथे हळदीकुंकू व आनंद बाजार हे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी महिलांचा हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या वेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात शिवव्याख्याते खंडू डोईफोडे यांचे मार्गदर्शक व्याख्यान झाले. सुसंस्कृत समाज घडवताना पालकांची भूमिका या विषयावर त्यांनी मोलाचे विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. शीतल उमाप–कोरके यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संस्थापिका सुरेखा काकी कोरके, डॉ. सई गुंड, नगरसेविका जयश्री घोडके, सविता डोईफोडे, संगीता कानगुडे, आशा करडे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आनंद बाजार या सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. कपिलदादा कोरके (अध्यक्ष, जगदंबा परिवार) यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी नाटके (गटशिक्षणाधिकारी, पं. स. बार्शी), कुंदन गावडे (पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस स्टेशन), ज्ञानेश्वर जाधव (विस्तार अधिकारी, वैराग बीट) उपस्थित होते.

आनंद बाजारमध्ये ११३ विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते. या उपक्रमातून सुमारे १ लाख १० हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळे, विविध खाऊचे पदार्थ तसेच स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढीस मदत झाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रोहन गडसिंग यांच्यासह बाळासाहेब गवळी, प्रशांत गोसावी, बालाजी होडगिरे, प्रशांत आलाट, स्वप्निल तुपे, संदीप पाटील, नईम चौधरी, आनंद कानगुडे, शामराव चिरंगे, ज्ञानदेव कापसे, शिवाजी काळुंखे, श्रीमती प्रवीण कुलकर्णी, श्रीमती सुनिता कांबळे, श्रीमती जयश्री गाडे, श्रीमती शलाका सूर्यवंशी, श्रीमती काळेल मॅडम, श्रीमती गुंड मॅडम आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या