तरुणांनी मोबाईलचा वापर करिअरसाठी करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0

शिवाजी विद्यापीठात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन, हजाराहून अधिक जणांचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आज, २४ मार्च रोजी ‘आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आणि उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक केले. आजच्या तरुणाईला मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले की, तरुणांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळून आपला ‘स्क्रीन टाईम’ कमी केला पाहिजे. मोबाईलचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता स्वतःच्या करिअरच्या प्रगतीसाठी आणि नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी करावा. तसेच, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तरुणांनी आरोग्याकडे लक्ष देऊन कायम तंदुरुस्त राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.50000या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून लाभलेले मेनन बेअरिंग्ज लिमिटेड आणि मेनन अल्कॉप लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अरुण आराध्ये यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, कोल्हापूरचे उद्योगक्षेत्र अशा विधायक आणि सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच सकारात्मक असते. शिवाजी विद्यापीठात राबविल्या जाणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना यापुढेही उद्योजकांकडून कायम पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध प्रायोजकांनी सढळ हाताने मदत करत मोठी देणगी दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भौतिकशास्त्र विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणार्‍या अशा शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी विभागाच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.50000नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सीपीआर (CPR) रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजाराहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरामध्ये खालील महत्त्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या: कान, नाक आणि घसा, सामान्य शल्यचिकित्सा, अस्थिरोग, जनरल फिजिशियन आणि मेडिसिन, दंतचिकित्सा, त्वचा रोग, नेत्र तपासणी, बालरोग, हृदयरोग, स्त्रीरोग. उपस्थितांची डोळ्यांची तपासणी करून गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात संपूर्ण रक्त व मूत्र तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध होती. आरोग्य तपासणीनंतर सर्व गरजू सहभागींना आवश्यक ती औषधे मोफत पुरविली गेली. या उपक्रमांतर्गत अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.50000या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध औद्योगिक व व्यावसायिक संस्थांनी सढळ हाताने आर्थिक आणि वस्तूरूप देणगी दिली. या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक खालीलप्रमाणे होते: मेनन बेअरिंग्ज लिमिटेड, एमआयडीसी गोकुळ शिरगाव, कोल्हापूर, हायलँड क्लब, शिरोली, सनशाईन एकर्स, सावर्डे, साउंड कास्टिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर, पार्थ ऑप्टिक्स, कोल्हापूर, आदित्य इंडस्ट्रीज, कोल्हापूर, सिद्धनाथ डेकोरेटर्स, कोल्हापूर, यश रेफ्रिजरेशन, कनेरीवाडी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. (डॉ.) आर. जी. सोनकवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संशोधन प्राध्यापक डॉ. एम. व्ही. टाकळे यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे प्रत्यक्ष उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, स्वागत परुळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, भूषण मिरजे, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर, कृष्णा लोंढे, वैद्यकीय समन्वयक, छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या