नाशिक मध्ये येत्या 2 मार्च ला आयोजीत धम्म मेळाव्यात बौद्धांचे शक्तिप्रदर्शन घडावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक दि 8 : येत्या नवीन वर्षात 2 मार्च रोजी नाशिक च्या गोल्फ क्लब मैदानात भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात येत असून या निष्पक्ष कार्यक्रमात जागतिक बौद्ध धम्म दलाई लामा आणि जगभरातील धम्मगुरुंना बौद्ध उपासक अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे .या बौद्ध धम्म मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातून एक लाखा पेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहून बौद्धांचे शक्तिप्रदर्शन घडवा.त्यासाठी सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारी लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
नाशिक च्या सातपूर मध्ये बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा स्नेह संवाद मेळावा रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आला होता.त्यात ना.रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; रमेश मकासरे ; सुरेश बार्शींग; श्रीकांत भालेराव; विजय वाकचौरे; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे; ऍड.बी के बर्वे; चंद्रशेखर कांबळे; घनश्याम चीरनकर; अमित तांबे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
जगात इस्त्राईल आणि हमास चे युद्ध सुरू आहे.रशिया आणि युक्रेन चे युद्ध सुरू आहे. आतंकवाद आणि युद्धातून हिंसक घटना वाढत आहेत त्यामुळे जगाला शांतता हवी आहे .विश्व शांती साठी युद्ध नाही तर जगाला बुद्ध हवा आहे.अहिंसा विश्व बंधुत्व आणि शांततेचा संदेश देण्यासाठी जगाला बुद्ध विचार; भगवान बुद्धांचा धम्म हवा आहे बौध्द धम्म हा संपूर्ण मानव जाती साठी आदर्श जीवनमार्ग आहे.त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन निष्पक्षपणे नाशिक मधील बौद्ध धम्म परिषद यशस्वी करावी.बौद्धांची ताकद राज्यात मोठी आहे.त्यामुळे बौद्धांचे शक्तिप्रदर्शन घडवा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
यावेळी राज्यात महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद निश्चित मिळणार असल्याने त्यावर उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची निवड करावी.यापूर्वी राज्यातील विदर्भ ; मराठवाडा ; पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई मधील कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागाची संधी मिळाली आहे त्यामूळे उत्तर महाराष्ट्रातील एखाद्या कार्यकर्त्यास मंत्री पदाची संधी द्या.