हाय परफॉर्मन्स या संघाने यवी एच पी एल ट्रॉफी पटकवली
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी व वी एच पी एल यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या VHPL Trophy मध्ये हाय परफॉर्मन्स या संघाने युनिक क्रिकेट अकॅडमी कळंब या संघावर वी एच पी एल ट्रॉफी पटकवली. या ट्रॉफी सहित आहे परफॉर्मन्स क्रिकेट संघाची विजयी घोडदौड चालूच राहिली.
पहिल्या सामन्यांमध्ये हाय परफॉर्मन्स क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वीराज मुंडे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय सार्थ ठरवत हाय परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी ने 20 षटकांमध्ये 4 बाद 255 धावा केल्या यामध्ये विहान येवणकर याने 77 चेंडू मध्ये 30 चौकार व एका षटकारसह 162 धावा कुटल्या. अर्णव जगदाळे यांनी युनिक क्रिकेट अकॅडमीचे 3 बळी घेत विजयी शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यामध्ये हाय-परफॉर्मन्स संघाने नाणेफेक जिंकून परत फलंदाजीचा निर्णय घेतला, तोही निर्णय सार्थ ठरवत 20 षटकांमध्ये 263 धावांचा डोंगर उभारला यामध्ये विहान येवणकर याने 44 चेंडूंमध्ये 12 चौकार व एका षटकारासह 84 धावा केल्या व अभिषेक देशमुख याने 61 चेंडूंमध्ये 24 चौकारांसह 135 धावांचा केल्या. प्रत्युत्तरात युनिक क्रिकेट अकॅडमी चा संघ केवळ 60 धावा करू शकला व हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी ने दोन्ही सामने जिंकून व्ही एच पी एल चषक पटकावला.