तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांना लाडू , केळी, पाणी औषधे वाटप, श्री अशोक महाराज प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे श्री अशोक महाराज प्रतिष्ठानच्या वतीने कोजारी पौर्णिमेला पायी चालत जाणाऱ्या लोकांना पाणी , केळी , लांडू ,औषधे, मलम , गोळ्या वाटप करण्यात आले. हजारो भक्तांनी त्यांचा लाभ घेतला आहे.
दर वर्षी पायी जाणाऱ्या लोकांची सेवा केली जाते. श्री अशोक महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक नागटिळक म्हणातात लोकांची सेवा ईश्वर सेवा आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवून लोकांना आगळा वेगळा सामाजिक संदेश देतात. वैराग ते तुळजापूर रस्त्यावर हजारो भाविक तुळजापूरला तुळजा भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.
त्यावेळी आप्पा नागटिळक , अशोक नागटिळक महाराज, उर्मिला काकी देशमुख , बापू नागटिळक , भैरवनाथ चौधरी , निलेश गिरम, श्रीराज हजारे , रितेश नागरगोजे , ज्ञानेश्वर चव्हाण , स्वप्नील भालशंकर, महेश जाधव, विक्रांत चव्हाण अरविंद आतकरे, इतर मान्यवर उपस्थित होते.