नालंदा बुद्ध विहार बार्शी येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्सहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नालंदा बुद्ध विहार बार्शी येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व धम्म सहारा ग्रुप बार्शी यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टाजवळील पुतळ्याला बाबासाहेब वाघमारे व अनिरुद्ध ओव्हाळ यांनी पुष्पहार अर्पण केला व त्या ठिकाणी बुद्ध वंदना सर्व महिलांनी घेतली. विहारात आल्यानंतर तथागताला धुपाने, दिपाने, पूजा करून बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष व प्रमुख वक्ते यांनी पुष्पहार अर्पण केला..व बुद्ध वंदना घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सुक्षीला खुणे ताई या होत्या…प्रमुख वक्ते बौद्धाचार्य जगदीश भालेराव यांनी आपल्या भाषणात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सर्व बौद्ध बांधवांना व भगिनींना व्यवस्थित व तिथीनुसार सांगितले.तथागताचा धम्म ,सम्राट अशोकाने घेतल्यानंतर तोच धम्म बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः नागपूर येथे धम्मदीक्षा घेतल्यानंतर बाकीच्या बहुजन समाजाला जवळजवळ पाच लाख लोकांना धम्मदीक्षा दिली.जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही..त्यांनी केलेली प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956 रोजी पूर्ण केली.अशा पद्धतीने भालेराव सरांनी लोकांना माहिती दिली.याप्रसंगी नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या महिलांनी देखील भाषणे केली.
बगाडे ताई, रंजना बोकेफोडे ताई, संस्थेच्या उपाध्यक्ष ओव्हाळ मॅडम,मैनाबाई अंकुशराव यांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. जयद्रथ गायकवाड सर यांनी केले तर आभार आश्वेष कुमार अहिरे यांनी मांडले.
अल्पोहाराचा कार्यक्रम दत्ता कांबळे ,सुरज कांबळे, दीपक सरवदे , संजय भालेराव, संदीप बुकेफोडे, सुनील कांबळे ,विजय कर्वे, बाबासाहेब वाघमारे, म्हैसकर सर , सुनिल कांबळे सर ,वाघमारे सर, इत्यादी बौद्ध बांधव उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांना अल्पोहारही देण्यात आला .अशा प्रकारे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन नालंदा बुद्ध विहार गाडेगाव रोड, बार्शी येथे संपन्न झाला.