विश्वशांतीसाठी बुद्ध हाच पर्याय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक दि.12 – जगात आतंकवाद दहशतवाद माओवाद नक्षलवाद आणि युद्धातून हिंसा आणि रक्तपात होऊन अशांतता वाढत आहे. मानव जातीच्या विकासासाठी विश्वात शांतता हवी आहे. भगवान बुध्दांनी जगाला शांती अहिंसा समतेचा मानवतेचा धम्म दिला आहे. त्यामूळे विश्वशांतीसाठी तथागत गौतम बुध्द हाच पर्याय आहे असे प्रतिपादन रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.नाशिक च्या त्रिरश्मी लेणी च्या पायथ्याशी आज 68 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ना. रामदास आठवले बोलत होते.
यावेळी येथे रोपण करण्यात आलेल्या ऐतिहासिक महाबोधी महावृक्षा चा प्रथमवर्धापन दिन ही साजरा करण्यात आला या कार्यक्रमास विचार मंचावर प्रमूख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री ना.किरण रिजिजू ; महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ ; आ.सरोज आहेर; आ.देवयानी फरांदे; जिल्हा अधिकारी जळज शर्मा; नाशिक मनपा आयुक्त करंजकर; रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे; उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक महापालिका आणि शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.आयोजक भदंत सुगत थेरो; भिख्खू संघ रत्न; भिख्खू आर्यनाग; भंते खेमधममो; भंते सत्यपाल; भंते नाग धम्मो; भंते आर आनंद; भंते सुगतप्रिय; आनंद भाऊ सोनवणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
नाशिक चे आंबेडकरी चळवळीत मोठे महत्व आहे.येवले येथे महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी ऐतिहासिक धर्मांतर घोषणा केली. त्यानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्मक्रांती करीत ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन केले.लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतात पुन्हा एकदा बौध्द धम्म पुनर्जीवित केला बौद्ध धर्म हा धर्म नाही तर धम्म आहे.भगवान बुद्धांनी जगाला समतेवर मानवतेवर विज्ञान विचारांचा बौध्द धम्म दिला आहे. नागपूर च्या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनी एकत्र येऊन महामानवाला अभिवादन करतात.तसे नाशिक ला त्रिरश्मी लेणी जवळ दर वर्षी 3 ते 4 लाख लोक एकत्र येतात.या ठिकाणी गेल्याच वर्षी पवित्र बोधी वृक्षाची शाखा लावण्यात आली असून त्याही बोधिवृक्षाचा प्रथम वर्धापन दिन आज साजरा होत असल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
जगात सर्वत्र भगवान बुद्धांच्या मूर्ती दिसतात .देशात सर्व जाती धर्मियांच्याघरी ; मोठ्या महालापासून हॉटेल पर्यंत अनेक ठिकाणी दर्शनी भागातच महाकारूणी भगवान बुद्धांच्या मूर्ती प्रतिमा असतात.अनेक सेलेब्रिटी जण आपल्या घरी बुद्ध मूर्ती ठेवतात.त्याचा आम्हाला अभिमान आहे .धर्म आणि धम्म यात मूलभूत फरक आहे. जगाला अहिंसा विश्वशांती विश्वबंधुता आणि विज्ञान शिकविणाऱ्या आणि अंधश्रध्दा कर्मकांड नाकारणाऱ्या धम्माची मानवतावादी शिकवण भगवान बुद्धांनी धम्मातून दिली आहे. त्यामूळे देशात खरी समता प्रस्थापित करण्यासाठी बुद्ध तत्वज्ञान सर्वांनी अंगीकारले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपसिका उपस्थीत होते . साऱ्या देशाचे आहे नाशिक कडे लक्ष कारण इथे वाढत आहे बोधिवृक्ष जसा वाढत राहील बोधीवृक्ष तसा वाढत राहील बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष अशा अनेक कविता ना.रामदास आठवले यांनी यावेळी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.