दीक्षारंभ कार्यक्रमा अंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची डॉ. नवनाथ कसपटे यांच्या सिताफळ संशोधन केंद्रला भेट

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी मधील विद्यार्थ्यांनी प्रगतशील शेतकरी डॉ. नवनाथ कसपटे यांच्या बार्शी येथील सिताफळ संशोधन केंद्रास नविन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण-२०२० नुसार दीक्षारंभ कार्यक्रमां अंतर्गत भेट दिली.

सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. नवनाथ कसपटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सिताफळ फळपिकावरील संशोधन कशा पध्दतीने चालते, संशोधनाची सुरवात, सिताफळांचे वाण, अभिवृध्दी, रोग व कीड व्यवस्थापन, विक्री व्यवस्था, प्रक्रिया उद्योगास भविष्यात संधी, यांची तसेच त्यांचेकडे असलेल्या सिताफळ पिकाचे ३००० वाणांचे नमुने असलेबाबतची सविस्तर माहिती दिली. सिताफळ हे पीक अत्यंत कमी पाण्यावर व कमी खर्चात येत असून याकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन कसा बदलता येईल व त्यांना जास्तीचे उत्पन्न कसे मिळवून दिले जाऊ शकते यावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांचे ज्ञानार्जनावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकावर भर द्यावा व याचा वापर त्यांच्या शेतात करावा असे आव्हान केले. तसेच आपल्या शेतीकडे पारंपारिक पध्दतीने न पाहता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन जास्तीत जास्त नफा मिळवता येतो यावर मार्गदर्शन केले.

अभ्यास दौऱ्याचे नियोजन, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव, पी. टी. पाटील, सहसचिव, ए. पी. देबडवार, खजिनदार, जे. सी. शितोळे व प्रभारी प्राचार्य, पी. आर. गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोनगे व्ही. ई., डॉ. शेंडे एस. एस. आणि कु. डॉ. बर्गे एम. एस. यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांनी दीक्षारंभ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या