सातारा येथील भिमाईभूमीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट

0

माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा / मुंबई दि.3 : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भीमाबाई आंबेडकरांच्या सातारा येथील भिमाईभुमी स्मारक उभारणीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून लवकर भिमाई भूमीत महामाता भीमाबाई अंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

आज सातारा येथील भीमाई भूमीला ना.रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट दिली यावेळी भीमाईभूमी चे संरक्षण करून माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असणारे साहित्यिक पार्थ पोळके यांच्या नेतृत्वात भीमाई स्मारकासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

सातारा येथे 1896 साली माता भीमाई अंबेडकर यांचे निधन झाले.त्यांचा अंत्यविधी सातारा येथे करण्यात आला.त्याच ठिकाणी माता भीमाबाई यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.हेच स्मारक स्थळ भिमाई भूमी म्हणून राज्यभरात सुप्रसिद्ध आहे.आज या भिमाई भूमीला ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन महामाता भिमाई चे स्मारक लवकर उभारण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा सरवदे;सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड; अण्णा वायदंडे; उत्तर महाराष्ट्राचे नेते रमेश मकासरे; सौ. लक्ष्मी मकासरे; दयाळ बहादुर: आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या