बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर :अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिकेव खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामात पिके प्रात्यक्षीकेतसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे. या करीता चालू वर्षीहरभरा, गहू या पिकाचे महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाखाली बियाणे घटकाचालाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पिकेप्रात्यक्षीके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविले जाणार आहेत. पिक प्रात्यक्षीकासाठी एका शेतकऱ्यांस 40 आर (1 एकर) क्षेत्र मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिलेजाणार आहे. प्रमाणीत बियाणे वितरणासाठीएका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांचा 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे. यानिविष्ठांचा पुरवठा करण्याकरीतालाभार्थींची निवड महा डीबीटी पोर्टलवर दि.6 ऑक्टोबर 2024 पर्यंत बियाणे, औषधे व खतेया टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभघ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या