भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे : प्रणितीताई शिंदे

0

शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणितीताई शिंदे यांचा धडक मोर्चा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी, विविध मागण्यासाठी, महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरवर भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला होता. हजारो शेतकरी, नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सामील झाले होते.

यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापुर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र त्या अश्वसनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटकुटीला आला आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव मिळत नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार ?, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळाली नाही याचा जाहीर निषेध, शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत केलेल्या 10 पट केलेली वाढ कमी करावी शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा दया, शेती अवजारे, खत व औषधे यावरील GST रदद् करा, 7.5 HP विज बिल माफ केले. 8 / 9 HP पुढील विज बील माफ करावे, PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतीसाठी कॅनल मधून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फलबाग यांचा पिक विमा विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मिळत नाही ते मिळावे, ज्या त्या भागात जे पिक घेतलं जातं त्याचा समावेश पिक विम्यात करण्यात यावा, प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जोवर घरकुल बांधण्याची परवानगी दयावी, ओला दुष्काळ जाहीर करा, प्रत्येक गावात ग्रामसेवक / कोतवाल यांची नियुक्ती करावी, गावास स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून दयावा, गावाला व शेतकऱ्यांना मागणीनुसार MSEB DP देण्यात यावा, नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूणवेळ दयावा, जल-जीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावा, दुधाला 40 रु दर मिळावा व दूध अनुदान शेतक-याच्या थेट खात्यामध्ये देण्यात यावे, सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे, गाव दत्तक घेतलेल्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही, शेतक-यांच्या वर्ग 2 जमीनी वर्ग 1 करण्यात यावेत, सर्व रस्ते plan मध्ये घ्यावे. Plan – Non Plan असा भेदभाव करू नये, DCC बँकेने शेतकऱ्यांना पूर्वप्रमाणे कर्ज पुरवठा करावा, मंगळवेढा तालुका २४ गाव उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करावी, मोहोळ तहसील कार्यालय हे तेथील जनतेच्या इच्छेप्रमाणे व्हावे, मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजास आरक्षण दयावे. त्याचप्रमाणे अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर येथील शेतीसाठी पाण्याचे नियोजन, असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण शासन लक्ष देत नाही ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करणारे सरकार आहे. महायुती सरकार मायबाप सरकार नसून उलट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे. असे म्हणत मी प्रत्येक क्षणाला शेतकऱ्यांसोबत आहे आपल्या लढायचे आहे आणि जिंकायचे आहे सगळ्यांनी मोर्चाला साथ दिली हीच एक निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी मायबाप साठी टिकू या तुम्ही मला सेवेची संधी दिली शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहीन

या मोर्चामध्ये माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, दिलीपराव माने, कॉ नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सिध्देश्वर कारखान्याचे मा. चेअरमन धर्मराज काडादी, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, महादेव कोगगुरे, शिवसेना जिल्हा अजय दासरी, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, अमर सूर्यवंशी, शालिवाहन माने देशमुख, भारत जाधव, संदीप पाटील, रईस टिनवाला, हरिष पाटील, महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, मल्लिकार्जुन पाटील, महिला अध्यक्ष शाहीन शेख, महिला शहर अध्यक्ष प्रमीला तुपलवंडे, राजेश पवार, किशोर पवार, गुरुसिध्द म्हेत्रे, रविकिरण कोळेकर, अख्तरताज पाटील, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भारत जाधव, मनोहर सपाटे, दत्तापंत वानकर, विष्णू कारमपुरी, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, बाळासाहेब डूबे पाटील, मयूर खरात, प्रथमेश म्हेत्रे, शितल म्हेत्रे, संजय हेमगड्डी, विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, मनोज गुलगुलवार, परविन इनामदार, फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, पृथ्वीराज माने, गणेश डोंगरे, अक्षय वाकसे, लक्ष्मण भोसले, शां व्हणमाने, सुधाकर जोकारे, श्रीकांत बनशेट्टी, शंभू भरले, श्रीकांत राठोड, मोतीलाल राठोड, सचिन गुंड, शाम साबळे, ईलाही पटेल, सुनील भोसले, श्रीराम पाटील, विकास राठोड, आप्पाशा आयवळे, चंद्रकांत कराळे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर पाटील, शंकर सातपुते, लक्ष्मण भालेराव, विजय पवार, विद्या कोळकुर, महादेव सुरवसे, दगडु शिंदे, भास्कर आठवले ,बाबा बाबर,विजय सावंत, दिलिप वागज, सभाजी मोटे, युवराज चव्हाण, रमेश हसापुरे, जुबेर कुरेशी, अंबादास करगुळे, युवराज जाधव, नजीब शेख, वाहिद विजापुरे, काशिनाथ कुंभार, केशव इंगळे, उदय चाकोते आरिफ पठाण, बाबुराव म्हेत्रे, शौकत पठाण, महेश जोकारे, सिद्धाराम चाकोते, सिद्धाराम चाकोते, रॉकी बंगाळे, नरसिंग असादे, एन के नाना क्षीरसागर, असिफ नदाफ, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, रुकियाबानू बिराजदार, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे, सागर उबाळे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, धीरज खंदारे, शिवशंकर अजनाळकर, राजेश झंपल, परशुराम सत्तारवाले, रेखा बिनेकर, राजेंद्र सिरकुल, हनुमंतू सायबोळू, रमेश जाधव, बालाजी जाधव, अनिल मस्के, गिरीधर थोरात, लक्ष्मण भालेराव, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे अरुणा बेंजर्पे, हरून शेख, वशिष्ठ सोनकांबळे, संजय गायकवाड, सिद्राम सलवदे, मोतीराम राठोड, प्रवीण वाले, अमोल भोसले, श्रीकांत वाडेकर, शंकर नरोटे, श्रीशैल रणखांबे, अस्लम शेख, एजाज बागवान, धोंडप्पा तोरणगी, नागेश मॅकल, व्यंकटेश बोम्मेन, माया कांबळे, शकील मौलवी, अभिषेक गायकवाड, दीनानाथ शेळके, अनिल वाघमारे, नागेश मेहेत्रे, शाहू सलगर, नूरअहमद नलवार, दशरथ गायकवाड, धर्मराज गुंडे, मल्लू सोलापुरे, राहुल बोळकोटे, संघमित्रा चौधरी, लता सोनकांबळे, राहुल वर्धा, मुन्नी मदर शेख, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, मीना गायकवाड, सलीमा शेख, किरण राठोड, कयूम बलोलखान, भाग्यश्री जाधव, सर्फराज शेख, भीमराव बंडगर, संदीप पवार, राजकुमार पवार, बाळासाहेब मगर समीर कोळी अरुण जाधव यांच्यासह हजारो शेतकरी, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक बंधुभगिनी सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या