मुंगशीतील नागझरी नदीपात्राकाठी विद्युत तारेचा शॉक लागून तीन म्हशींचा मृत्यू,शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने कुटूंबातील तिघेजन बचावले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा. ) येथे नागझरी नदीपात्राकाठी विद्युत तार तुटल्याने नदीपात्रालगत चरणाऱ्या तीन म्हशींना शॉक लागून मृत्यू झाला आहे ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता मुंगशी शिवारात घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंगशी येथील शेतकरी जयकुमार अर्जुन कोरे यांच्या गट नं ७५ / २ मध्ये ते स्वतः पत्नी, मुलगा आपल्या शेतात सोयाबीन काढत होते नदीच्या काठाला म्हशी चरत असताना नदीच्या काठाला तुटलेली तार असल्याने त्यात विद्युत प्रवाह चालू असल्याने त्या तारेला तीन म्हशी चिटकल्या त्यांना काढणाच्या प्रयत्न पत्नी व मुलगा करत असल्याचे शेतकऱ्याने पाहिल्यावर जोरदार ओरडल्याने ते तात्काळ थांबले नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती या घटनेमुळं शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पशूधन विकास अधिकारी डॉ रामचंद्र पाटील , उपअभियंता अनुप ओव्हाळ , गावकामगार तलाठी अरविंद कादे , पोलिस उपनिरिक्षक शिवाजी हाळे ,पो कॉ प्रदिप चव्हाण , क्षीरसागर पोलिस पाटील , उपसरपंच अशिष क्षीरसागर , डॉ. रणजित क्षीरसागर आदांनी घटना स्थळावर भेट घेऊन घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला.

माझा पूर्वजात दुग्ध व्यवसाय असून माझे कुटूंब दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे आजच्या घटनेनं माझे सुमारे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याने माझा संसार उघडयावर पडला आहे त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन त्वरीत मला आर्थीक मदत मिळावी – जयकुमार कोरे, पशुपालक शेतकरी

नागझरी नदीपात्राच्या कडेला शेतातील विद्युत खांबावरील तार तुटल्याने हा अपघात घडला आहे तरी या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल – अनुपम ओव्हाळ महावितरण कनिष्टअभियंता सुर्डी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या