रातंजन येथे गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
अशोक नागटिळक महाराज यांचे हजारो भक्तानी घेतले दर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे जय महाकाली माता देवीच्या मंदिरात गुरुपोर्णिमा दिवशी भविकांनी मोठी गर्दी होती. अशोक नागटिळक महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविक भक्त गुरु पोर्णिमेच्या शुभेछ्या देण्यासाठी दिवसभर गर्दी मोठी होती. दिवसभर मोठ्या उत्साहात रातंजन येथे गुरु पोर्णिमा साजरी करण्यात आली. प्रत्येक शिष्यानी लाल काला पांढरा पोशाख घालून होम जपास सूरवात केली. प्रत्येक शिष्यानी गुरुला फुलाचा हार घालून श्री अशोक महाराज यांची आरती ओवाळून गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या. भाविकाना आलेल्या महाराष्ट्रातून सर्व भक्तांना जेवण्याची उत्तम सोय केली होती.
सर्व शिष्यांनी पुष्पहार घालून आरती ओवाळणी गुरुचे दर्शन घेतले. अशोक महाराज यांचे हजारो भविकांनी दर्शन घेतले. सोशल मिडिया आणि फोन वरुण गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या. शिष्य आणि गुरु महत्व या कार्यक्रमातून दिसून आले. अतिशय सुंदर कार्यक्रम आनंदमय वातावरणात उत्साहात गुरुपोर्णिमा साजरी झाली.
गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब नागटिळक विष्णु शिंदे, बापू नागटिळक, भैरवनाथ चौधरी , मनोज काका कुलकर्णी, सूरज रसाळ , सिद्राम नागरगोजे, महेश जाधव , निलेश गिराम , अरविंद आतकरे, गणेश लंगोटे, आकाश बनसोडे, ओंकार कांबळे , अक्षर राऊत, सनी काळे , रणजित जाधव, समाधान डवरी, रितेश नागरगोजे, धीरज बनसोडे, इतर लोकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवट महाकाली देवीची आरती करण्यात आली. भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.