संत निरंकारी चॅरिटबल फाउंडेशन व वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली ब्रांच बार्शी व बार्शी वन विभाग शेंद्री येथील मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर झोनचे झोनल प्रमुख परम आदरणीय इंद्रपालसिंह नागपालजी व बार्शी वन अधिकारी श्रीमती करे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात करे मॅडम म्हणाल्या की आपण लावत असलेल्या रोपांची जोपासना म्हणजेच वृक्ष संवर्धनाचे काम आमचे वनविभाग अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे व निरंकारी मंडळ करत असलेल्या कार्याचे श्रीमती करे मॅडमनी कौतुक केले, इंद्रपालसिंह नागपालजी म्हणाले की संत निरंकारी मंडळ पूर्ण जगभरामध्ये सद्गुरूंच्या कृपेने अशा प्रकारचे वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व समाज उपयोगी कार्य निरंतर करत आहे. या कार्यक्रमात खोंदे साहेब, शेख मॅडम, शेंद्री गावचे सरपंच चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य गोंदील , ज्ञानेश्वर शिंदे ग्रामरोजगार सेवक, परम आदरणीय सबकचंदजी, विठ्ठल बचुटेजी बार्शी ब्रांच मुखी यांची उपस्थिती लाभली यावेळी 1100 रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली.

कार्यक्रमासाठी बार्शी युनिटचे सेवादल संचालक किशोर ढोले, वैराग युनिटचे सेवादल संचालक चंद्रकांत उंबरे, सेवादल शिक्षक ऋषिकेश शेळके राजेंद्र चव्हाण, शशिकांत शिंदे, विश्वनाथ कापसे, शाम पाटील, गणेश उमाप व सेवादल आणि संत निरंकारी चॅरेटबल फाउंडेशनच्या सदस्याचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या