ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाज या नावातच वेगळेपण जपत असलेल्या ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी आयोजीत ८ मार्च जागतिक महीला दिन सोहळा २०२४ या दिनाचे औचित्य साधून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम उत्साहात पार पडला. ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून शबासकी देणारे कर्तव्यदक्ष असे बार्शी शहराचे नगरपालिका मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
सूश्रुत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल बार्शी डाॅ संजय अंधारे ,बार्शी ग्रामीण भागाचे पी आय, एम एन जगदाळे, ग्रामीण रूग्णालय बार्शीच्या प्रभावती लाड,डाॅ राजश्री शेटे, तसेच जाणिव फाउंडेशन वसंत हवालदार इ प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ,माता सावित्री, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांची मनोगत झाले. ओन्ली समाज सेवा बहुऊद्देशीय संस्था बार्शी यांनी २१ अशा विवीध क्षेञातील उत्कृष्ठ कार्य करत असलेल्या महीलांचा सन्मान केला. यामध्ये आदर्श माता, वीरपत्नी, शिक्षण ,आरोग्य, वीज महामंडळ, एस स्टी सेवा, नगरपरिषद स्वच्छता दुत कामगार,काही महिला बचत गट अशा सर्व क्षेञातील महीलांचा सत्कार ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.याप्रसंगी पदाधिकारी महिला पदाधिकारी, सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.यापुढेही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.सूत्रसंचालन दिवाणजी व उल भगत यांनी केले असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.