पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याची विद्यार्थ्यांना संधी – सचिन वायकुळे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज येथील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर भवितव्याच्या वाटा निवडताना सकारात्मक पत्रकारितेतून नवीदिशा “व्हॉईस ऑफ मीडिया सोबत समाजाचा आवाज व्हा” हा मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार व स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे यांनी मार्गदर्शन केले. मंगळवार दिनांक 26 रोजी बी.पी.सुलाखे कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन वायकुळे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा शोधताना अनेक क्षेत्रे असली तरी पत्रकारिता हे देखील असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्वच क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन स्वत:चे मत व्यक्त करण्याची व समाजाला सकारात्मक दिशा देण्याची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या तरी किमान पात्रता ही सर्वसामान्य आहे. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या योग्य उमेदवारास मंत्रालयात देखील अधिकारी पदावर काम करण्याची संधि उपलब्ध आहे. याप्रसंगी समाजातील घडणार्‍या अनेक घडामोडींची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्नोत्तर स्वरुपात त्यांच्या भावना समजून घेतल्या. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची योग्य उत्तरे दिली त्यांना पुस्तकांची भेट देण्यात आली.

प्रास्ताविकात अजित कुंकूलोळ यांनी व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना अल्पावधीतच जागतिक स्तरावर पोहोचली आहे व पत्रकारांच्या मूलभूत समस्या सोडवत आहे याची माहीती दिली. तसेच लवकरच बार्शीत व्हॉईस ऑफ मीडियाचे स्वत:चे आकाशवाणी केंद्र सुरू होत असल्याची माहिती देऊन यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करियरची संधी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी बी. पी. सुलाखे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. आजचा उपक्रम हा अत्यंत सकारात्मक असून व्हॉईस ऑफ मीडिया ही व्हॉईस ऑफ इंडिया होऊन सर्व सामान्यांचा आवाज व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, महासचिव गणेश शिंदे, शहराध्यक्ष हर्षद लोहार, प्रा. संजय करंडे, प्रा.एन.आर. सारफळे, प्रा. के. बी. चपटे, प्रा.बी.डी. लांडे, प्रा.एम.ए.ढगे, प्रा. के.एम.माळी, प्रा.के.बी.चक्कावार, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीर कुरेशी, विजय शिंगाडे, मल्लिकार्जुन धारूरकर, शाम थोरात, प्रवीण पावले, विक्रांत पवार, श्रीशैल माळी, लखन शेंडगे, संगीता पवार, भूषण देवकर, समाधान चव्हाण, आदिनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या