क्रांतिबा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षां प्रबोधनातून महामानवांना अभिवादन व त्यांच्या स्वप्नातील समाज बनवण्याच्या उद्देशाने बार्शी नगर परिषद सफाई कामगार (कायम व कंत्राटी) यांच्यावतीने बार्शी शहरात खुल्या गटातील वक्त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धा दिनांक ११/४/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता बार्शी नगरपालिका चौक येथे पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित ठेवलेले असून नाव नोंदणी ची मुदत ७/४/२०२४ पर्यंत आहे
वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे
१) भारतीय संविधाना पुढील आव्हाने व लोकशाही टिकवण्या साठीची युवकांची जबाबदारी २) भारतीय संविधानाने स्त्रियांबद्दल केलेले कार्य ३) बहुभाषिक व बहुधर्मियांना एकत्र ठेवणारे संविधान खरंच धोक्यात आहे.
४) शिक्षणाचे व नोकऱ्यांचे खाजगीकरण देशविघातक की देशहिताचे. ५) आरक्षण समज गैरसमज.
या स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे
प्रथम पारितोषिक :- १०१३४ रुपये व सन्मानपत्र
द्वितीय पारितोषिक :- ७१३४ रुपये व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक :- ५१३४ रुपये व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ ११३४ रुपयांची २ बक्षिसे व सन्मानपत्र या स्पर्धेसाठी प्रवेश फी १३४ रुपये नाममात्र ठेवलेली असून ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे अय्याज पठाण — 9049727660 निखिल मस्के – 9156594909 संतोषकुमार भोंडे – 8445302402
यांचेकडे नोंदवावीत असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या