धाराशिव लोकसभेसाठी आनंद काशीद यांच्या उमेदारीवर बार्शी तालुक्याच्या वतीने शिफारस

0

धाराशिव लोकसभेसाठी सकल मराठा समाजाची वैराग येथे बैठक संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : मनोज जरांगे – पाटील यांच्या आदेशानुसार एक लोकसभा एक अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या अनुषंगाने वैराग येथे सकल मराठा समाजाची बैठक पार पडली त्यामध्ये चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो सर्वांनी मान्य करणे , एक लोकसभा एक उमेदवार तसेच ज्यांना जास्तीच्या संख्येने लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहीचे आहे. त्यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी तसेच धाराशिव लोकसभेसाठी आनंद काशीद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. हे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी किशोर देशमुख , राजाभाऊ चव्हाण , विनायक घोडके , सज्जन करंडे, धनंजय गरड यांच्यासह मराठा बांधव मोठया संख्येन उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या