आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहरातील विहीरींची पाहणी करून भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील पाणी टंचाई परिस्थितीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बार्शी शहरातील भगवंत मंदिर विहीर, शनी मंदिर विहीर,जवाहर हॉस्पिटल विहीर,बेदराई विहीर,कोर्ट विहीर,घोडे गल्ली विहीर,रामेश्वर मंदिर विहीर,गाडेगांव रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र यांची पाहणी करून पाणी पुरवठ्याच्या सध्य परिस्थितीचा आढावा घेतला.नागरिक माता-भगिंनीना होत असलेल्या त्रासाबद्दल नागरिकांची काळजी घेण्यासाठी अधिका-यांना फैलावर घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने कामकाज करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सक्त ताकीद व आदेश दिले.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून बार्शी नगरपालिके मार्फत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बार्शी शहरात अनेक भागात बार्शी नगर परिषदेमार्फत बोअर घेऊन त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत. यावेळी जलदाय अभियंता अजय होनखांबे साहेब,मनोज खरात साहेब,गायकवाड साहेब,माजी नगरसेवक दिपक(आबा)राऊत, भैय्या बारंगुळे,मंदार कुलकर्णी तसेच नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.