डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची : राजा माने

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली : मनोज पाटील

भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी : दीपक शिकारपूर

पुणे : सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे कसे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन खिशातच अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे हे अत्यंत प्रभावी असून यातून देवाण-घेवाणही तेवढ्याच तत्परपणे काही क्षणामध्ये मिळत असल्याने आगामी काळात या डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाचे भविष्य उज्वल असल्याचे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार व संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते.

आजच्या काळामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती काही सेकंदामध्ये आपल्या हातातील मोबाईल मध्ये मिळत असली तरी सुद्धा त्याची सत्यता ही निर्मित संस्थेवरती अवलंबून असते सध्या जगामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे माहीती थेट मिळत असली तरी सुद्धा या माहितीची अचूक आणि थेट नेमकी माहिती डिजिटल प्रतिनिधींकडेच असते. या नव्या तंत्रज्ञानाचा कायद्यांच्या चौकटीत बसून कसा फायदा घ्यायचा याबाबत यावेळी मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.

संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी डिजिटल माध्यमांचे बदलते स्वरूप अन् डिजिटल मीडिया या क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती विश्लेषण करताना आगामी काळातील माध्यमांवरील आव्हाने आणि या आव्हानातही डिजिटल मीडियाचे अस्तित्व कसे अबाधित राखायचे याबाबत सखोल विश्लेषण केले. सध्या जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरती कोणतीही रचना करण्यात येत असली तरी यामध्ये कोणती काळजी घ्यायची या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहे तर नव्या आव्हानांना सामोरे जाताना संगणकाचा या डिजिटल माध्यमातून कसा फायदा होत आहे आणि यातून नक्की काय साध्य करता येईल या विषयावरती ही विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजा माने यांनी अनुभवाच्या जोरावर बदलत्या आव्हानांना कसे सामोरे जायचे अन् तंत्रज्ञानाच्या वाढत्या भडिमारामध्ये आपल्या डिजिटल माध्यमांची विशेष पकड आणि वेगळेपण हेच आगामी काळात या आव्हानांना सामोरे जाण्यास ताकद दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगून विविध विषयावरती डिजिटल माध्यमांनी आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन केले. तर पुणे शहर विभागाच्या वतीने ही एक अनोखी संधी निर्माण केल्यामुळे तंत्रज्ञान आणि कायदे या विषयावरती सखोल चर्चा करण्यास एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे कायदे आणि तंत्रज्ञान ही डिजिटल मीडिया साठी कायमच हातामध्ये हात घालून जाणारी गोष्ट आहे आणि डिजिटल मीडिया म्हटलं की वेळ आणि त्यावरची कसरत ही साध्य करताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या पत्रकारांना कोणती काळजी घ्यावी याविषयीही माहिती दिली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये नंदकुमार सुतार (संपादक) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान डिजिटल माध्यमांसाठी कशी वरदायीनी आहे हे स्पष्ट करून सांगताना याबाबत विस्तृत माहिती दिली. या बदलत्या तंत्रज्ञानानुसार परदेशात दैनंदिन वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान हे डिजिटल पन्नकारिता किती फायदेशीर आहे याची माहिती देत फक्त याबाबत कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत याविषयीही मार्गदर्शन केले. याबाबत माध्यमतज्ञ चंद्रकांत भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांसाठी उपलब्ध कायदे आणि डिजिटल माध्यमांची विश्वासहार्यता याबाबत मार्गदर्शन केले तर विधीज्ञ अतुल पाटील यांनीही माध्यमांसाठी आचारसंहिता आणि कायदे या विषयावरती सखोल विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे आयोजन माऊली म्हेत्रे : राज्य संघटक, महेश टेळे पाटील : अध्यक्ष पुणे शहर, हर्षद कोठावडे कार्याध्यक्ष पुणे शहर, धनराज माने,कार्याध्यक्ष पुणे शहर, केतन महामुनी : सहसचिव यांनी केले होते .सतीश सावंत उपाध्यक्ष, विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महेश कुगांवकर : सचिव, राज्य संघटक : संजय कदम,शरद लोणकर, अमोल पाटील, तेजस राऊत, सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश बोतालजी, पुणे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य स्वामी,पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विकास शिंदे, गणेश हुंबे यांच्यासह डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या