प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत गौडगाव, रुई ते आंबेगाव रस्त्यासाठी ५ कोटी व वैराग ते हत्तिज रस्त्यावरील पुलासाठी ३ कोटी २४ लाख मंजूर – आमदार राजेंद्र राऊत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत बार्शी तालुक्यातील गौडगाव,रुई ते आंबेगाव या 6.050 लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा बार्शी तालुक्यातील इतर विविध रस्त्यांना लवकरच मंजुरी मिळणार आहे, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वैराग ते हत्तिज रस्त्यावरील सा.क्र.८/१६० मधील येथील नवीन पुलाचे काम करण्यासाठी ३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..वैराग ते हत्तिज रोडवरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती.पूरपरिस्थितीत वैराग ते हत्तिज रोडवरील नागरिकांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येतील.हा पूल अस्तित्वात आल्यानंतर वैराग ते हत्तिज मार्गावरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
सदर महत्वाच्या कामांसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे.