पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभाग व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर शाखेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंभर जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शनिवार दिनांक 16 रोजी श्री वर्धमान जैन स्थानक, सोमवार पेठ, बार्शी येथे हे शिबीर संपन्न झाले. या आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकारांची नेत्र तपासणी, रक्ताच्या तपासण्या यात हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, थायरोइड , किडनी, व डायबेटीसच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच ई.सी.जी, व ब्लड प्रेशर, इत्यादि तपासण्या करण्यात आल्या.
राज्याचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव गणेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, शहर अध्यक्ष हर्षद लोहार, सचिव जमीर कुरेशी, उपाध्यक्ष विजय शिंगाडे, खजिनदार प्रवीण पावले, मयूर थोरात, अस्लम काझी, आदि उपस्थित होते.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.शीतल बोपलकर, आनंद ऋषिजी नेत्रालय नगरचे भाऊसाहेब आदमाणे, महालॅबचे पंडित कागणे, युसुफ जमादार, श्री वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष जयचंद सुराणा, दैनिक, साप्ताहिक, डिजिटल माध्यमातील पत्रकार संघटना, आदींचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्लिकार्जुन धारूरकर, प्रदीप माळी, समाधान चव्हाण, शाम थोरात, नीलेश झिंगाडे, ओंकार गायकवाड, सागर गरड, राहुल भालशंकर यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या