भारतीय राज्य घटनेच्या मुल्यांचा प्रसार झाला पाहिजे : ॲड. योगिनी खानोलकर

0

जगण्याचा मार्ग संविधान उद्देशिका पुस्तिकेचे प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भारतीय राज्य घटना ही मानवतावादी, धर्मनिरपेक्ष आणि सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारी आदर्श घटना असून संविधानातील तत्व, मुल्ये आणि विचारांचा प्रसार झाला पाहिजे यासाठी जगण्याचा मार्ग संविधान उद्देशिका पुस्तिका लिहिली असल्याचे लेखक व राष्ट्रीय जनआंदोलनाचा समन्वय समितीचे कार्यकर्ते मनिष देशपांडे यांनी मत व्यक्त केले. येथील राजर्षी शाहु विधी महाविद्यालयामध्ये या पुस्तिकेचे प्रकाशन नर्मदा खोरे बचाव आंदोलनातील कार्यकत्यां विधिज्ञ योगिनी खानोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगो देशपांडे बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य रत्नदिप सोनकांबळे, डॉ. अशोक कदम, ॲड. प्रशांत येडके, व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे होते. यावेळी ॲड. योगिनी खानोलकर यांनी समाजातील अनाथ, निराधार, विस्थापित, प्रकल्पग्रस्त, भूमिहिन, मागास वर्ग, मजूर व कामगार, परितक्त्या महिला व शेतकरी यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक जाणिवा जपणाऱ्या वकिलांनी वंचित, शोषित घटकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले पाहिजे व सामाजिक चळवळीमध्ये उतरले पाहिजे. असे आवाहन केले. यावेळी श्रीगोंदाच्या उडाण पब्लिकेशन प्रकाशन संस्थेच्या वतीने हि पुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल संचालक प्रमोद काळे यांचे आभार मानत देशपांडे यांनी समाजातील शेवटच्या घटकांचे जगण्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी व त्यांच्यावरील अन्याय दुर करून त्यांना संरक्षण व न्याय देण्यासाठी अनेक भरीव तरतुदी उपलब्ध आहेत. मात्र राज्यघटनेतील विचार सतत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध मार्गाने पोहोचविण्याची गरज आहे. संविधान हाच आपला जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने केलेल्या तरतुदींमुळेच भारतातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा अनुशेष भरून निघु शकेल. मात्र हे संविधान विद्यार्थ्यांपासून महिलापर्यंत पोहोचविले पाहिजे.

संविधानाबाबत झालेल्या जागृतीमुळे भारतीय लोकशाही बळकट होईल तसेच विशेष म्हणजे हे पुस्तक लोकशाही स्वरूपानुसार लिहिले असुन संविधान प्रचारक लोक चळवळीमधील मनिष देशपांडे, ॲड.निलेश खानविलकर, नागेश जाधव, प्रवीण जठार, लारा पागडे, सुमित प्रतिभा संजय, अजय बोरकर, स्वाती जठार सर्व लेखकांच्या एकत्र येऊन विचार विनिमय करून हे पुस्तक सर्वानुमते लिहिले गेले आहे हे पुस्तक लोकांचा जगण्यात येईल असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच हि पुस्तिका केवळ २० रूपयात उपलब्ध करून दिले असून तिचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या