कापसी ते सावरगाव रोडवरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नाबार्ड अंतर्गत २ कोटी ९१ लाख रूपये मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्याचे विकासरत्न आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नाबार्ड अंतर्गत तालुक्यातील कापसी ते सावरगाव रस्ता साखळी क्रमांक ४/५०० वर पुलाचे बांधकाम करणे यासाठी २ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गेली अनेक वर्षे हा पुल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांची मागणी होत होती.याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे तेथील ग्रामस्थांनी मागणी केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरील पुलाचे काम मंजूर कऱण्यात आले असून निधीची तरतूद करण्यात आली आहे.या पुलामुळे अनेक गाव वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे.
सदर महत्वाच्या पुलाच्या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले,तसेच तेथील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार व्यक्त केले.