पांगरी भागतील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा निधी मंजूर, ६५ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी तसेच ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून ६५ कोटी ४८ लाख मंजूर करण्यात आले आहेत.
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. पांगरी येथील हे रुग्णालय आता ३० खाटांवरुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने विशेष बाब
म्हणून पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबतचा नुकताच शासनादेश काढला आहे.
बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनादेशासह ही माहिती दिली.पांगरी ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याच्या ग्रामीण भागातील पांगरी मुख्य ठिकाणचे शासकीय आरोग्य सेवेचे रुग्णालय आहे. येथे अंतःरुग्ण व बाह्यरुग्ण कक्षात मोठ्या संख्येने रुग्ण येतात.ग्रामीण रुग्णालय पांगरी येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ४४ कोटी ४ लाख,नवीन ट्रामा केअर युनिटचे बांधकाम करणे यासाठी ९ कोटी ४८ लाख, वैद्यकीय अधीक्षक,वैद्यकीय अधिकारी,वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने बांधकाम करणे यासाठी ११ कोटी ९६ लाख असे एकुण ६५ कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पांगरी ग्रामीण रूग्णालय ३० खाटांवरून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता,त्यांच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणार असुन या रुग्णालयात पांगरीसह आसपासच्या गावातील रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे.आमदार राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत,त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे रूग्णालयाचे काम पुर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.
सदरील मंजूरीबद्दल जनतेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत साहेब यांचे आभार मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, रमेश (आण्णा) पाटील,माजी नगरसेवक विलास (आप्पा) रेणके,प्रशांत कथले मालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक,बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राजेंद्र राऊत,सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय गरड सर,ॲड.अनिल पाटील,पांगरी तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख उपस्थित होते.