राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरात 77 रक्त बाटल्यांचे संकलन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बार्शी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात झालेल्या या शिबिरात 77 जणांनी रक्तदान केले.
या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विश्वास बारबोले, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे , जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल पटेल, जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे, बार्शी तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, शहराध्यक्ष किरण देशमुख, उद्योग व्यापारचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप कुलकर्णी, युवक शहराध्यक्ष आदेश वाणी ,भारत बारबोले, वैभव बारबोले, युवक उपाध्यक्ष भास्कर बगाडे , युवक सचिव सूर्या मस्के ,वैरागचे समाधान पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पक्षाचे विद्यार्थी शहराध्यक्ष आदित्य पाटील, कार्याध्यक्ष शिव सुरवसे, उपाध्यक्ष अनिरुद्ध माने, उपाध्यक्ष प्रथमेश गवळी, उपाध्यक्ष अभि होनमाने, प्रसिद्धीप्रमुख आदित्य आवाड,अविनाश गाजरे ,बालाजी पोकळे ,शुभम हरभरे , सुदर्शन कोरे , रोहन मुळे आदी पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले. माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले व शहर कार्याध्यक्ष विक्रमसिंह पवार यांनी मार्गदर्शन केले.