निवडबार्शी

पत्रकार सागर गरड यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पत्रकार क्षेत्रातील संघटनात्मक व उल्लेखनीय कार्याबद्दल सागर गरड यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांनी दि. 22 डिसेंबर 2023 रोजी नियुक्तपत्र देऊन संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.

ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणीची त्यांना जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांनी व्यक्त केली. पत्रकार सागर गरड यांनी दै. पुण्यनगरी, दै. संचार,जनता न्युज 24 च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवूण देण्याचे कार्य ते गेल्या १५ वर्षापासून करत आहेत.

सागर गरड यांच्या निवडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, मा.आ.दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष संदीप मठपती, बार्शी तालुका ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण आवारे, तसेच पत्रकार सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. युवा ग्रामिण पत्रकार संघ हा सार्वाधिक सभासद असलेला पत्रकार संघ आहे, पत्रकाराला न्याय व हक्कासाठी, सामाजिक प्रगती करिता सदैव कटिबध्द असलेला संघ म्हणून युवा ग्रामिण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button