बार्शीत तृतीय पंथींची दिवाळी गेली गोड : स्मार्ट अॅकॅडमीत पोलिस जाणीव सेवा संघाचा उपक्रम
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील तृतीयपंथींना दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळीही गोड करण्यात आली. स्मार्ट अॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्रात पोलीस जाणीव सेवा संघाने हा उपक्रम घेतला. या फराळ वाटपानंतर तृतीयपंथींनी समाधान व्यक्त केले. उद्योजक महेश यादव यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.
पोलिस प्रशासनाला सातत्याने सहकार्य करणाèया पोलिस जाणीव सेवा संघाचे राज्यभर जाळे विस्तारले आहे. बार्शीत पोलीस जाणीव सेवा संघाने सामाजिक उपक्रमातही सक्रीय सहभाग नोंदवला आहे. आजपर्यंत रवी फडणवीस यांच्या मागदर्शनाखाली विविध उपक्रम ते राबवित आले आहेत. याचाच भाग म्हणून बार्शीतील तृतीयपंथींसाठी हा फराळ वाटप करण्यात आला. तृतीयपंथींच्या प्रश्न, समस्यांचा यावेळी वेध घेत अकॅडमीचे संचालक तथा लेखक सचिन वायकुळे यांनी पोलिस जाणीव सेवा संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उद्योजक महेश यादव म्हणाले, वंचित घटकांसाठी असे उपक्रम घेणे हीच खरी दिवाळी आहे. येणाèया काळातही आशा वंचितांसाठी समाजाने पुढे आले पाहिजे. यानंतर पोलिस बाळकृष्ण दबडे यांनीही तृतीयपंथींना मार्गदर्शन केले. योवळी पोलिस जाणीव सेवा संघाच्या सर्व सदस्यांनी स्वत:च्या घरातील फराळाचा डब्बा आणून तो तृतीयपंथीना दिला.यावेळी तृतीतयपंथी किरण हिने मनोगत व्यक्त करून सर्व मान्यवरांनी दिलेला सन्मान आम्हाला निश्चितच आणखी शक्ती देणारा आहे, असे सांगितले. यावेळी पोलिस जाणीव सेवा संघाचे रमेश कानडे, कौशल्या राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे रमेश कानडे, प्रशांत गुंड, चंद्रकांत कदम, पोलिस कर्मचारी बाळकृष्ण दबडे तसेच भाग्यश्री बोंडवे, कौशल्या राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस जाणीव सेवा संघाच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.